शिरपूर येथील पोलिस व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरा

0

शिरपूर । आजच्या काळाची गरज म्हणून ओळखला जाणारा सीसीटीव्ही कॅमेरा आता शिरपूर येथील पोलिस व्हॅनवर बसविण्यात आला आहे. शिरपूर येथील पोलीस स्टेशनच्या दोन व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला. ज्यामुळे पोलिस प्रशासनला आता रोडरोमिओ तसेच दंगलग्रस्थ भागात चिथावणी करणारे भामटे पुराव्यानिशी सापडणार आहेत, तसेच पोलिस प्रशासनाला आपल्या कर्मचार्‍यांवर सुद्धा लक्ष ठेवता येणार आहे. पोलिसव्हॅन कुठे फिरते?, कोणत्या भागात, किती वेळ थांबली, पोलीस ड्रायव्हर व्हॅन घरी तर घेऊन गेला नाही ना? यावरही अंकुश ठेवता येणार आहे. शहरातील हिडन आय सीसीटीव्ही कॅमेरा अ‍ॅण्ड सिक्युरिटी सिस्टीम मार्फत हे कॅमेरे बसविले गेले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर हे पहिले पोलीस स्टेशन असणार आहे जेथील पोलीस व्हॅन वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत. पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजप सानफ यांनी बोलतांना सांगितले की, शहरातील कायदा व सुवस्था अबाधित रहावी, यासाठी आम्ही सीसीटीव्ही व्हॅनचा प्रभावीपणे वापर करणार आहोत, तसेच गाव गुंड, रोडरोमिओ यांची सीसीटीव्ही कॅमेराद्वारे दैनंदिन चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहोत. यासाठी पोलीस अधिक्षक एम.रामकुमार, अप्पर अधिक्षक विवेकपानसरे व उपअधिक्षक संदीप गावित यांचे मार्गदर्शन लाभत आहे.