शिरपूर येथे प्राथमिक शिक्षकांचे स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण कार्यक्रम

0

शिरपूर । जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास धुळे व पंचायत समिती शिरपूर (शिक्षण विभाग) यांच्या सहकायाने शिरपूर येथील आर.सी.पटेल ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे प्राथमिक शिक्षकांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास निम्न प्राथमिक स्तरावरील प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

इंग्रजीचे संप्रेषण गरजेचे
प्रशिक्षण वर्गास धुळे येथील संचालिका प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी या प्रशिक्षण वर्गास भेट देवून शुभेच्छा देत ग्रामिण भागातील मुलांना इंग्रजी भाषेतील कौशल्य विकसनासोबत इंग्रजी भाषेचे व्यावहारीक संप्रेषण देखील येणे गरजेचे असून शिक्षकांची स्वत: ती कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थांपर्यंत संक्रमित करावीत असे आवाहन केले.

आयोजकांचे कौतुक
प्रशिक्षणाच्या यशस्वीसाठी साधन व्यक्ती पंचायत समिती शिरपूर येथील सचिन जडीये, प्रमिला मुडावदकर यांचे योगदान लाभले. गटशिक्षणाधिकारी पी. झेड. रणदिवे यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.

इंग्रजी मॉड्युल्साचा आढावा
या प्रशिक्षण वर्गाच्या समन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.नीता सोनवणे होत्या. त्यांनी देखील व्यक्तिश: संप्रेषणात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कॉलेज प्राचार्य जे.एल.चौधरी यांनी सदर प्रशिक्षण वर्गास देवून शिक्षकांशी सुसंवाद साधला व इंग्रजी मॉडयुल्स बद्दल थोड्क्यात आढावा घेतला. स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण वर्गासाठी मास्टर ट्रेनर म्हणून भावना पाटील व ईश्‍वर पवार होते. प्रोजेक्टर व शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्यांद्वारे विविध कौशल्यांचे व संकल्पनांचे मार्गदर्शन देण्यात आले.