शिरपूर । संपूर्ण जगभरात भारताची संस्कृती खूपच महान असून आपल्या देशात आईचे खूपच महत्व आहे. जगभरात भारतीय मातेचे गुणगाण होते. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सर्वच महिलांचे योगदान मोठे आहे. अनेक मातांचे जीवन व त्यांचे कार्य आदर्शवत असून घरातील प्रत्येकाला सुसंस्कृत करण्यासाठी प्रत्येक माता घेत असलेले परीश्रम अतुलनीय आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने कुटुंबातील प्रत्येक मुलामुलीला उच्च्शिक्षीत करावे असे आवाहन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले. जागतिक मातृ दिनानिमित्त शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते 14 मे रोजी आदर्श माता सन्मान सोहळा संपन्न झाला. शिरपूर शहर व तालुक्यातील 15 मातांचा आदर्श पुरस्कार देवून गौरविण्यात येवून यथोचित सन्मान करण्यात आला.
यांचा केला सन्मान : अतिशय प्रतिकुल परिस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या 15 मातांना स्मृतीचिन्हे, साडी देवून नगराध्यक्षा पटेल यांनी सन्मान केला. मणकर्णाबाई मोरे कुरखळी ता. शिरपूर, वत्सलाबाई पाटील अर्थे, विजया भामरे शिरपूर, लताबाई हासवाणी शिरपूर, लताबाई निकुंभे वाडी, मंगलाबाई पवार होळनांथे, वैशालीबाई विजयराव कुलकर्णी शिरपूर, विजया संजय जोशी शिरपूर, तसनिम सादीक अली फैजी शिरपूर, मैरुन्नीसा बी मलिक अल्लाउद्दीन शिरपूर, रईसाबी रहेबर अली सैयद शिरपूर, हसमुखभाई पटेल यांच्या सुकन्या शितल पटेल शिरपूर, रामबाई किताराम पावरा गु-हाळपाणी, गंगाबाई हिरामण सोनवणे खर्दे ता. शिरपूर, हर्षा बाबुलाल धमाणी शिरपूर या 15 महिलांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती
यावेळी कार्यक्रमास कक्कूबेन पटेल, किरणबेन पटेल, रीटा पटेल, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रमिलाताई चव्हाण, तृप्ती गांधी, न.पा. महिला व बालकल्याण सभापती अरुणा थोरात, नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, वैशाली देवरे, रेखा सोनार, मुमताजबी कुरेशी, लक्ष्मीबाई भिल, डॉ. अश्विनी देशपांडे, प्रा.डॉ.पायल दंदे, शिसाका संचालिका सुचिता पाटील, डॉ.जयश्री निकम, डॉ.सिमा पाटील, डॉ.वर्षा वाडीले, डॉ.ललिता पवार, डॉ.कांचन ईशी, शालिनी सोनवणे, दिपा अग्रवाल, रत्नप्रभा सोनार, कल्पना कोळी, अंजली हासवाणी, संगिता थोरात, मनिषा मोरे, विविध संस्थांच्या पदाधिकारी महिला, डॉक्टर्स, वकील, शहर व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापिका मिनल स्वर्गे यांनी केले. सूत्रसंचलन पौर्णिमा पाठक यांनी केले. आभार हेमलता गवळी यांनी मानले.
अश्रूंचा बांध फुटला
आईचे महत्व लक्षात घेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक महिला भावनाविवश झाल्याने नगराध्यक्षांसह अनेक मातांचा अश्रूंचा बांध फुटला. सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल होत्या. जि.प. महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, पं.स. सदस्या रंजना गुजर, एस.टी. डेपो मॅनेजर स्वाती पाटील, नपा. माजी नगराध्यक्षा व बांधकाम सभापती संगिता देवरे, माजी उपनगराध्यक्षा व पाणी पुरवठा सभापती छाया ईशी, नगरसेविका नाजेराबी शेख, मुख्याध्यापिका मिनल स्वर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.