शिरपूर येथे शिलाई मशीन वाटप आणि प्रशिक्षण

0

शिरपूर। एसएमआयटी फाऊंडेशन च्या आर्थिक सहकार्याने आणि ल्युबिन फाँउंडेशनच्या तांत्रिक सहाय्याने आंबे ता.शिरपूर येथे दोन महिन्याचे शिवनकाम प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष उद्योगासाठी 50% अनुदानात शिलाई मशीनची वाटप भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राहुल रंधे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राहुल रंधे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ठाकूर, डचखढ फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर दीपक बडगुजर, मनमोहन चौधरी, साहेबराव पावरा, योगेश पावरा, सुमनताई पाडवी, सत्तरसिंग वळवी, रोहिणी चे सरपंच संदीप देशमुख, खामखेड्याचे सरपंच रामलाल पावरा, राजेंद्र माळी, नितीन माळी, दिलीप तुंगार राजू पाटील भागवत देसले प्रशिक्षणार्थी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.