शिरपूर येथे स्वाभिमान प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन

0

शिरपूर। येथील खालचे गाव बालाजी रोड चंचल साडी जवळ स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बाफणा व सभासदांनी कडक उन्हाचे औचित्य साधून पाणपोई चे उदघाटन केले. गावातील व ग्रामीण भागातील अनेक लोकांचा या रस्त्यावरून जास्त प्रमाणात येणे व जाणे कायम राहते. याबाबत अनेकांनी स्वता होवून पाण्याचे जार मुफ्त दिल्याचे बाफणा यांनी सांगितले मार्च पासून पाणपोईला सुरूवात झाली तर मे महिना एप्रिल महिन्यात च बुक झाल्याचे दिसून आले. याठिकाणी वाढदिवस व अ‍ॅनव्हरसरी, पुण्यस्मरण या महत्वाच्या दिवशी ही लोक पिण्याच्या पाण्याचा जार स्वतःहून बुक करीत आहेत.

यशस्वितेसाठी यांचे प्रयत्न
सध्याच्या अतिशय कडक उन्हाळ्यात तहानलेल्यांची क्षुधा शमविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई चा अभिनव योजने मागील कल्पना विशद करताना स्वाभिमान प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय बाफणा यांनी सांगितले की हल्ली शिरपूर शहरात येणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे त्यांची तहान भागविण्याच्या हेतूने ही पाणपोई सुरू करण्यात आली या पाणपोईत पंचवीस ते तीस पिण्याचे पाण्याचे जार नियमितपणे येत आहेत. पिणार्‍यांना फिल्टर केलेले व थंडगार असे शुध्दपाणी मिळत आहे. यासाठी सुरेश माळी, महिपेंद्र रावल, मनोज संकलेचा, छोटू मिस्तरी, संजय कुंभार, मोहसीन बोहरी, राजू भाई बोहरी, हुजेफर बोहरी, मुकेश बाफणा, दुर्गेश चौधरी व गणेश कोचर आदी सभासद परीश्रम घेत आहेत. या उपक्रमाचे स्वाभिमान प्रतिष्ठानाचे सभासद व यासाठी स्वतःहून पाणी मुप्त देणार्‍या दानशूरांचे कौतुक केले जात आहे.