शिरसाडच्या तरुणाची आत्महत्या

0

यावल– तालुक्यातील शिरसाड येथील नामदेव पांडुरंग धनगर (27) या तरूणाने बुधवारी दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्राथमिक औषधोपचारानंतर त्यास जळगाव हलवत असताना निमगांव गावाजवळ त्याची प्राणज्योत मावळली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्‍चात आई-वडील व भाऊ असा परीवार आहे.