यावल- तालुक्यातील शिरसाड येथे एका 26 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी गावात घडली. विवाहितेच्या फिर्यादीनुसार गावातुन ती धुणे धुण्याकरीता जात असताना गावातील संशयीत आरोपी मयुर प्रकाश कोळी याने विवाहितेची छेड काढली व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे तिला उद्देशून संवाद साधला. या प्रकरणी आरोपीविरूद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस तडवी करीत आहे.