जळगाव : भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिरसोलीतील 20 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. रणजीजत संभाजी पानगडे (20, इंदिरानगर, शिरसोली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
शिरसोलीतील रणजीत पानगडे हा तरुण बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने दुचाकीने जात असताना समोरून येणार्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन (एम.एच.19 सी.यु.4963) जोरदार धडक दिल्याने रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले. मयत रणजीतच्या पश्चात आई, बहिण, काका असा परीवार आहे.