शिक्रापूर । शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात तीन वर्षात 3 हजार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात यश आल्याची माहिती शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.शिरुर हवेली मतदारसंघात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात यश आले असून यामध्ये न्हावरे-तळेगाव-चाकण-तळेगाव दाभाडे, जामखेड-बीड-न्हावरे, शिरुर-चौफुला-वाठार स्टेशन, पुणे-औरंगाबाद या मार्गांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत बेल्हा-पाबळ-पिंपरी सांडस-शिंदवणे रस्ता 265 कोटी, शिरुर-पुणे रस्ता उड्डाणपुलासहीत सहापदरीकरणासाठी 462 कोटी एकूण डिपीआर 1,250 कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आला आहे.
सात गावांना 211 कोटी
अष्टविनायक मार्गासाठी 150 कोटी मंजूर झाले असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 50 कोटींची कामे मंजूर झाले आहेत. त्याअंतर्गत 100 किमी लांबीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. रुरबर्न योजनेंतर्गत लोणी काळभोर समुहातील सात गावांना 211 कोटी मंजूर झाले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून 15 कोटी रुपयांची कामे शिरुर-हवेलीत पुर्ण झाली आहेत. सी. एस. आर फंडातून 15 कोटींची कामे करण्यात यश आले. शिरुर येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर भवनचे काम सुरू असून 30 कोटींच्या आठ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. तीन वर्षात 500 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले असून त्यासाठी 15 कोटी खर्च झाले आहेत.
उरुळी कांचन पाणी पुरवठा योजनेसाठी 23 कोटी
जलस्वराज टप्पा 2 मधून तर्डोबाची वाडी पाणी पुरवठा योजनेस 25 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे शिक्रापूर पाणी पुरवठा योजनेसाठी 13 कोटी, उरुळी कांचन पाणी पुरवठा योजनेसाठी 23 कोटी मंजूर झाली आहेत. चासकमान कालव्याची गळती रोखण्यासाठी 28 कोटी रुपये मिळविण्यात यश आले आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. ट्रॉमा केअर सेंटर 6 कोटी 50 लाख, मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी 7 कोटी 50 लाख, मांडवगण-कानगाव पुलासाठी 4 कोटी 50 लाख, शिरुर नगर परिषदेंतर्गत भुमिगत वाहिनी टाकण्यासाठी 9 कोटी मंजूर झाले आहेत.
निधी मिळविण्यात यश
शिरुर नगरपरिषदेच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी 2 कोटी 50 लाख, फर्निचरसाठी 3 कोटी, पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी 2 कोटी मंजूर झाले असून ठिबक सिंचन अनुदान 750 कोटी मिळवून देण्यात यश आले आहे. कोल्हापुर पद्धतीच्या बंधार्यावर ढापे बसविणे यासाठी 26 कोटी मंजूर झाल्याची माहिती पाचर्णे यांनी दिली.