शिरूड परीसरात पावसाची जोरदार हजेरी

0

अमळनेर । तालुक्यातील काही भागात आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विजेच्या कळकळासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील काही भागात कापूस, कांदा व चार्‍याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. शिरुड सह परिसरात आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमार विजा व वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे 20 ते 25 मिनिट झालेल्या जोरदार पावसाने कपाशी पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंगेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थँडीचा जोर ओसरला होता ह्या अवकाळी पावसाने चार्‍याचे मोठ्या प्रामानावर नुकसान होणार आहे. तर शेतकर्‍यांची ज्वारी व बाजरी चे काढून कणसे हि शेतात पडली आहेत. तर अमळनेर शहरात वादळी वारे सुटल्याने लाईन बंद करून ठेवल्याने संध्याकाळी अंधार असल्याने खूप हाल झाले.