शिरूर । गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आनंद शिरूर शहरात भाजपच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून साजरा केला.
भारतीय जनता पक्षाने सोमवारी (दि.18) जाहीर झालेल्या निकालात गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये घवघवीत यश प्राप्त झाले. भाजप शिरूर शहर व भारतीय जनता युवामोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिशबाजी करत पेढे वाटले.यावेळी भारतीय जनता युवामोर्चा पुणे जिल्हा चिटणीस मितेश गादिया, शिरूर शहर अध्यक्ष केशव लोखंडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, युवामोर्चा अध्यक्ष संकेत दुगड, नवनाथ जाधव, राजु शेख, शिवा गाडे, निलेश नवले, तुषार वेताळ, नितीन जाधव, विजय नर्के, हुसेन शहा, उमेश बाफना, राहुल पवार, बाबुराव पाचंगे, प्रमोद गायकवाड, प्रकाश धाडीवाल, अमिर बाले तसेच ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.