शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बुकींच्या संपर्कात

0

नवी दिल्ली-अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा हा बुकीच्या संपर्कात होता असा खुलासा आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बी.बी. मिश्रा यांनी केला आहे. राज कुंद्राने सुरुवातीला बुकीच्या संपर्कात नाही, असे सांगितले. मात्र तपास अधिकाऱ्यांनी बुकींच्या फोन नंबरचा विषय काढताच राज कुंद्राने बुकींच्या संपर्कात असल्याचे कबुली दिली.

बी.बी.मिश्रा यांनी यापूर्वी देखील भारतीय संघातील खेळाडू बुकींच्या संपर्कात होते असा खुलासा केला आहे.