शिवकॉलनी परिसरात चॉपर, फायटर ताब्यात

0

जळगाव । शिव कॉलनी परिसरात संशयितरित्या चकदे हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर चार जण फिरत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस स्थानकाच्या पोउनि रोहिदास ठोंबरे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून चौघांची झाडाझडती घेतली असता. दोघांकडून एक चॉपर आणि एक फायटर जप्त करण्यात आले आहे. सोबत 20 हजार रुपये किमंतीची मोटारसायकलसह चौघांना चौकशीसाठी रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला.

चौघांपैकी एक फरार; तिघे अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार पो.कॉ. सागर तडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोउनि रोहिदास ठोंबरे पो.ना. प्रदिप चौधरी, पो.ना. शरद पाटील यांनी खाजगी वाहनाने शिव कॉलनी परिसरातील चकदे हॉटेलसमोर संशयास्पद आशुतोष अनिल सोनार (वय 19, रा. पहूर ता. जामनेर), हर्षल मनोज मोरे (वय 16 रा. डीएनसी कॉलेज, जळगाव), शुभम विकास अत्तरदे (वय 19 रा. शंकरराव नगर साई अपार्टमेंट) त्या सोबत एक फरार झालेला स्वप्नील सखराम सोनवणे (रा. जैनाबाद) चौघे जण फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्याने त्यांची अंगाची झाडाझडती केली असता. एक चॉपर आणि एक फायटरसह मोटारसायकल क्र. एम.एच.19/ए.एस.1214 मिळून आला त्यामुळे यातील तिघांना ताब्यात घेत ऑर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.