जळगाव – जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले शिवतांडव ढोल पथक श्रीराम जन्मोउत्सव मिरवणुकी मध्ये सामील झाले होते. एकूण 40 ढोल 8 ताशे उपस्थितांचे विविध तालावर लक्ष वेधणारे होते.
छत्रपती शिव वंदन करताना ढोल पथकाचे यावेळी वादन करण्यात आले. शहरातील विविध चौका मध्ये शिवतांड पथकाने नागरिकांची दाद मिळवत सादरीकरण केले. यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. ढोल पथकामध्ये तरुण जल्लोष करीत सहभागी झाले होते.