स्वारगेट : शिवनेरी बसमधून प्रवाश करणार्या दोन ज्येष्ठ नागरिकांची बॅग स्वारगेट बस स्थानकातून चोरली. बस सुरु होण्या अगोदरच बसच्या बाजूला असलेल्या डिकीतून ही बॅग लांबवण्यात आली. याप्रकरणी एका प्रवाशाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना राज्य परिवहम महामंडळाच्या स्वारगेट आगाराचे प्रमुख सुनिल बोरसे यांनी सांगितले. 13 फेब्रुवारी रोजी दोन ज्येष्ठ नागरिक स्वारगेटवरुन ठाण्याला जाण्यासाठी शिवनेरी बसमध्ये बसले होते. त्यांनी त्यांच्या सामानाची बॅग बसच्या डिकीमध्ये ठेवली होती. ते ठाण्याला उतरल्यावर त्यांना बॅग आढळून आली नाही. यामुळे त्यांनी तेथील आगाराकडे चौकशी केली.
घटना सीसीटीव्हीत कैद
दरम्यान ते नुकतेच पुन्हा पुण्याला आले होते. त्यांनी यासंदर्भात स्वारगेट आगारात विचारणा केली. तेव्हा 13 तारखेची सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांची बॅग एक व्यक्ती गाडीच्या डिकीतून काढून घेऊन जाताना आढळला. याप्रवाशाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वारगेट आगारात सुरक्षेच्या कारणास्तव 20 सीसीटीव्ही बसवले आहेत.