शिवनेरी महोत्सव; सत्यशिल करंडक नृत्यस्पर्धा उत्साहात

0

जुन्नर । जुन्नर नगर वाचनालयाच्यावतीने आयोजित शिवनेरी महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धा नुकत्याच झाल्या. यामधील सत्यशिल करंडक नृत्य स्पर्धेत शालेय गटात 48, खुल्या गटात 25 व बालक विभागात 19 संघ सहभागी झाले होते. नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सतिश राणे व बालकमंदिर विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती संजय काळे, नगराध्यक्ष शाम पांडे, देवेंद्र खिलारी, यशराज काळे, धनंजय डुंबरे, नगरसेवक अविनाश कर्डिले, दिपेश परदेशी, नितीन गांधी, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

5 हजार कापडी पिशव्यांचे वाटप
जुन्नर नगर परिषेदेच्या स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत प्लास्टिक बंदी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शेरकर यांच्या मित्र परीवारातर्फे 5 हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमित्रा शेरकर, पंकज डुंबरे, प्रमोद बनकर, वैभव हिंगणे, प्रदीप मुरादे, तुषार वाबळे, विनायक कर्पे, भैय्या म्हस्करे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाराम कवडे, सुहास शेटे यांनी केले. नगर वाचनालयाचे अध्यक्ष ललित गुजराथी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

स्पर्धेत संघांनी मारली बाजी
खुल्या गटात मोरया नृत्य प्रबोधनी, र्‍हीदम ग्रुप, द रिनुअन ग्रुप, कलाविष्कार ग्रुप, स्पार्क ग्रुप, नृत्यरागिणी ग्रुप, शिवस्व ग्रुप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, शालेय गटात एसबीपी इंग्लिश मिडीयम स्कुल, सेंट डेब्यू स्मार्ट स्कुल, न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल, चिचोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, प्राथमिक विद्या मंदिर बारव, पाडळी जिल्हा परिषद शाळा, मुकबधीर विद्यालय, शासकीय आश्रम शाळा अंजनावळे, बालक मंदिर गटात गोविंद वासुदेव जोशी गजरे बालक मंदिर, सेंट डेब्युज स्मार्टस स्कुल, एसबीपी इंग्लिश मिडीयम स्कुल, प्लॅनेट एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कुल, विद्या प्री स्कुल यांनी बाजी मारली.