हाडांच्या तपासणी अहवालानंतर होणार उलगडा : पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा
भुसावळ- शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील एका पुलाजवळ जळालेल्या अवस्थेतील हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पाटील यांनी तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या हाडांचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली आहेत. दरम्यान, ही हाडे मानवाची की कुण्या प्राण्याचा हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. पुलाखाली मिळालेली नेमकी हाडे कुणाची ? या कारणांचा उलगडा होण्यासाठी पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे यांनी हाडे मिळाल्याच्या वृत्ताला दुजारो दिला मात्र आत्ताच त्याबाबत काही सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.