शिवपूर कन्हाळ्यात तालुका पोलिसांनी लाखांचे गावठी दारूचे रसायन केले नष्ट

0

भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा गावातील गवळी वाड्यात शनिवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी खलील हसन गवळी (रा.कन्हाळा) हा बेकायदा गावठी दारू बनवत असताना पोलिसांनी कारवाई करीत नऊ ड्रममधील एक हजार 800 लीटर रसायन नष्ट केले तसेच 25 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. 60 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल. तसेच शिवपूर कन्हाळा शिवारातील धांडे यांच्या शेताजवळील नाल्या जवळ संशयीत आरोपी जुम्मा पिरू गवळी हा गावठी दारू तयार करीत असताना पाच ड्रममधील 900 लिटर नष्ट करण्यात आली तसेच 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. एकूण 32 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार अजय माळी, हवालदार प्रवीण पाटील, विठ्ठल फुसे, युनूस ईब्राहिम, होमगार्ड भूषण पाटील आदींनी केली.