शिवप्रेमींनी दुर्बिणीने लावला शिवस्मारकाचा शोध!

0

मुंबई । सन 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे कोणतेही काम सुरू झाले नसल्याने शिवप्रेमींनी सरकारच्या निषेधात आंदोलन केले आहे. नरिमन पॉइंटवर शिवप्रेमींनी समुद्रातील शिवस्मारकाची दुर्बिणीने पाहणी करत सरकारचा निषेध केला. स्मारकाच्या भूमिपूजनाला एक वर्षं झाले तरी एकही वीट रचली न गेल्याने शिवप्रेमींनी आंदोलन केले. यावेळी ’या या शिवस्मारक पाहा’ अशा आशयाचे फलक घेऊन शिवप्रेमींनी गर्दी केली होती. यादरम्यान शिवप्रेमी आंदोलकांनी पंतप्रधानांंविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. स्मारकाचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.