भोपाळ: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळले. महिन्याभरापूर्वी संपूर्ण देशाने मध्य प्रदेशातील राजकारण पाहिले. कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र कोरोनामुळे शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. दरम्यान आज मंगळवारी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्यपाल लालजी टंडन यांनी भाजप आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यात कॅबिनेट पदाची नारोथ्थम मिश्रा, कमल पटेल, मीना सिंह, तुलसी सीलावत, गोविंद सिंह राजपूत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.