येरवडा : महिलांनी छ.शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे मत बसपाच्या सचिव मेनका कराळेकर यांनी व्यक्त केले. महाराज ग्रुप च्या वतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणात भीमनगर मध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी पारंपरिक तसेच सांस्कृतिक खेळ तसेच गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. महाराज ग्रुप चे अध्यक्ष किशोर महाडिक, धनराज शेवाळे, कुमार, धनके, शंकर लंगोटे, शाम गोड, महेश नरवडे, राजेश लंगोटे ,सचिन तरडे, महादेव लंगोटे, अजय लंगोटे , देवबाई सांळुखे, सारीका शेवाळे, शुभांगी लंगोटे, कोमल गायकवाड, कोकिळा गोड, सविता बाराथे, मनीष लंगोटे,तसेच भीमनगर येथिल नागरिक उपस्थित होते.
कराळेकर म्हणाल्या की,माता जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणी माता जिजाऊंनी चांगल्या प्रकारे शिकवण दिल्यामुळेच त्यांनी समाजातील सर्वसामान्य जनतेवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवून स्वराज्याची स्थापना करून समाजाला न्याय मिळून दीला. तसेच प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक दिल्यामुळेच त्या काळात छत्रपतींच्या राज्यात आपल्या माता-भगिणी ह्या सुरक्षित राहू शकल्या. याबरोबरच त्यांनी त्याकाळात कोणत्याही प्रकारे जाती-धर्माचे राजकारण न करता सर्व समाजातील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जितेंद्र कराळेकर व समीर शेख यांनी केेले.