भुसावळ विभागात शिवजयंती उत्साहात ; दुचाकी रॅली, प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन
भुसावळ- जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमुळे देशावर संकट कोसळल्याने भुसावळ शहरासह विभागात शिवजयंती अत्यंत साधेपणाने साजरी केली. भुसावळ येथील स्वराज्य सेनेतर्फे सजीव देखावा सादर करून लक्ष वेधण्यात आले तर मराठा समाजाच्या मिरवणुकीत देशभक्तीपर गाणे वाजवून शहिदांना नमन करण्यात आले. भुसावळ विभागात दुचाकी रॅली काढण्यात आली तसेच ठिकठिकाणी प्रतिमा पूजनही करण्यात आले.
भुसावळ स्वराज सेनेच्या देखाव्याने वेधले लक्ष
भुसावळ- ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी मंगळवारी भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात वातावरण शिवमय झालेले होते. शिवाजी नगरातील स्वराज सेनेतर्फे मंगळवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या भव्य मिरवणुकीत शिवजन्मोत्सवाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. सोबतच या मिरवणुकीत मराठमोळ्या वेशभुषेत लेझीम पथक, आकर्षक सजीव देखावे, ढोल-ताशाचा गजर यावेळी करण्यात आला. विद्यार्थी, विद्यार्थीनी, युवक पारंपरिक मराठमोळी वेशभूषा परिधान करून सहभागी झाले, महाराजांच्या आयुष्यातील विविध देखावेही सादर करण्यात आले. मावळ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव असलेला दरबार भारतीय संस्कृती दर्शवित होता.
‘घराघरात शिवजयंती स्पर्धा’
स्वराज्य सेनेतर्फे ‘घराघरात शिवजयंती स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे. इच्छुक नागरीकांनी स्वत:च्या घरीच शिवाजी महाराजांची प्रतिमा सजावट करून त्याचे फोटो आयोजकांना व्हॉटस्अॅपवर पाठवायचे आहे. फोटो मिळताच आयोजकांची चमू संबंधितांच्या घरी जाऊन सजावटीचे परीक्षण करणार आहे, अशी माहिती स्वराज सेनेचे अध्यक्ष प्रशांत बागले यांनी दिली.
यावल शहरात निघाली दुचाकी रॅली
यावल- छत्रपती शिवाजी उत्सव समितीतर्फे बोरावल गेटपासून दुचाकी रॅली काढण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्षा सुरेखा कोळी, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, बाळासाहेब शिर्के, धीरज अनिल चौधरी, उमेश फेगडे, नगरसेवक सुधाकर धनगर यांनी दुचाकी वाहनांच्या फेरीस भगवा ध्वज दाखवला. यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी उत्सव समिती अध्यक्ष राहुल कचरे, विजय शिर्के, नरेंद्र माळी, राहुल धनगर, गोलू माळी, विजय भाई, पवन खैरे, जयदीप देशमुख यांनी परीश्रम घेतले.
यावल महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
यावल– कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की, जय अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.ए.पी.पाटील, प्रा.राजू पावरा, प्रा.दिनेश वसावे, प्रा.छात्रसिंग वसावे, कार्यालयीन अधीक्षक आर.ई.पाटील, संतोष ठाकूर, बाळू पाटील, मनोहर सावकारे, अनिल पाटील तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मध्य रेल्वे भुसावळ विभाग
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिंहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी वरीष्ठ मंडळ कार्मिक प्रबंधक एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मी नारायण, वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, मुख्य चिकित्सा अधिकारी सामंतराय, वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता (टीआरओ) पी.के.भंज तसेच सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
फैजपूरातही जयंतीचा जल्लोष
फैजपूर- चर्मकार बांधवातर्फे संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संत रोहिदास महाराज व शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व धीरज चौधरी व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ शरद बिर्हाडे होते. सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम, धीरज चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमोल निंबाळे, नगरसेवक देवा साळी, इरफान मेंबर, सुनील रमेश वाढे, समाजसेवक गजानन ठोसरे, रघुनाथ कुंभार, दिव्यांग सेना तालुकाध्यक्ष नाना मोची, शहराध्यक्ष नितीन महाजन यांच्यासह चर्मकार समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी नाना मोची, कन्हैया वरछे, विक्की काकडे, शेखर काकडे, पुंडलिक उसरे यांच्यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते.
धनाजी नाना महाविद्यालय
फैजपूर- शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे. छत्रपती शिवराय रयतेचा राजा म्हणून किर्तीवंत म्हणून अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे भारतभुमीचे दैवत असल्याचे प्रतिपादन इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.जगदीश पाटील यांनी फैजपूर येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवानिम्मित आयोजित अभिवादन सभेत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे होते. उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, प्रा.डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.डॉ.एन.एल.चव्हाण, प्रा.डॉ.ए.के.पाटील, प्रा.लेफ्ट राजेंद्र राजपूत, प्रा.डॉ.नितीन चौधरी, प्रा.राकेश तळेले, राजेंद्र तायडे, आर.एस.सावकारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले. यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे, संगम फिरके यांनी सहकार्य केले.
भुसावळ शहरात शिवजयंती उत्साहात
भुसावळ- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, तालुकाध्यक्ष व जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नितीन, उल्हास पगारे, दुर्गेश ठाकुर, रवी सपकाळे, सारंग पाटील, रणजीत चावरीया, शेतकरी संघ चेअरमन पंढरीनाथ पाटील, कृउबा उपसभापती अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एस.आर.पाटील, नारायण सपकाळे यांची उपस्थिती होती.
वंचित बहुजन कंत्राटदार संघटना
भुसावळ- वीज निर्मिती केंद्रातील कार्यरत असलेल्या वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून अभिवादन करण्यात आले.प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सहसचिव उस्मान पठाण, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक प्रकाश तायडे, सदस्य नारायण झटके, शकिल खान, रवी सरदार, सुरेश टाक, हरपालसिंग संसोये, जगदीश तराळ, गोकुळ पाटील, नितीन हिवाळे, दिनकर सुर्यवंशी, विजयकुमार भालेराव आदी उपस्थित होते.