पुणे । कोथरूड येथील प्रस्तावित शिवसृष्टी संदर्भात मुंबईत मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून याला महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे.
कोथरूड येथील प्रस्तावित असलेल्या शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो का शिवसृष्टी अथवा दोन्ही? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच तेथे मेट्रो स्टेशन होणार हे निश्चित झाले आहे. असे असताना शिवसृष्टीही तेथे झाली पाहिजे असा आग्रह काही नगरसेवकांनी धरला होता. परंतु त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त या ठिकाणी शिवसृष्टीसुद्धा होऊ शकते असा अहवाल महामेट्रोने दिला होता.