पुणे : शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिली, असे खोटे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात या मागणीसाठी पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. त्यांच्या या पवित्र्यानंतर उस्मानाबादच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करून थकीत एफआरपीची चौकशी व्हायलाच हवी. एफआरपी न दिलेल्या १५ कारखान्यावर कारवाई करावी. तसेच ज्या प्रकारे सातारा, सांगली, कोल्हापूरचा एफआरपी तिढा सुटला तसा लवकरच सोलापूर, पुणेसह बाकी महाराष्ट्रचा तिढा सोडवला जाईल असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.