मुक्ताईनगर- जळगाव सामान्य रुग्णालयात एका रुग्णास दाखल करून मुक्ताईनगरकडे निघालेले शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील हे 19 च्या मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातातून बालंबाल बचावले. झाले असे की, रात्री 1.30 वाजेच्या सुमारास जळगावकडून मुक्ताईनगरकडे मारोती स्वीप्ट कारने येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वरणगाव व बोहर्डी दरम्यान समोरून येणार्या भरधाव कंटेनरने स्वीप्टला समोरून धडक दिल्याने वाहनाचा चुराडा झाला मात्र नशीब बलवत्तर असल्याने लागलीच गाडीतील एअर बॅग्ज उघडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला व चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात या वाहनामागून वरणगावचे उपनिरीक्षक निलेश वाघ हे वाहनाने जात असताना त्यांनी पाटील यांना अपघातग्रस्त वाहनातून काढत उपचारार्थ हलवले. या घटनेची माहिती वरणगाव येथील शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनाही देण्यात आल्यानंतर तत्काळ अतिदक्षता रुग्णवाहिका मागवण्यात आली.