मुंबई- ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या अमित शाह यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच ‘पटकवले’ आहे, इतक्या लवकर हे विसरलात का, अशा थेट शब्दांत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. या नव्या वाक्-युद्धामुळे युतीची अपेक्षा केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे.
शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच "पटकवले" आहे. इतक्या लवकर विसरलात?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2019
लातूर येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीवरून शिवसेनेला इशारा दिला होता. शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत धरले जात होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेनेही भाजपावर हल्लाबोल केला.