शिवसेना वर्धापनदिनाच्या निमित्त शिबीराचे आयोजन

0

पाचोरा। शिवसेना वर्धापनदिनाच्या निमित्त शिवसेनेतर्फे आज शुक्रवारी 16 रोजी करण्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील, पुणे अंधजन मंडळ, भवरलाल कांताबाई जैन फांऊडेशन द्वारा पुरुस्कृत कांताई नेत्रालय हॉस्पीटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पाचोरा, भडगाव तालुका शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 29 जून दरम्यान पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ह शिबीर संपन्न होणार आहे. शुक्रवारी आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांद्रा ग्रामीण रुग्णालयात शिबीराचे उद्घाटन होणार आहे.

शिबीराचे ठिकाण नांद्रा येथे शुक्रवारी 16 रोजी, पिंपळगाव हरेश्‍वर 17 रोजी, नगरदेवळा 18 रोजी, शिवतिर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा लोहटार उपजिल्हा रुग्णालय 19, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा 21, प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव 22, गुढे रुग्णालय 24, ग्रामीण रुग्यालय भडगाव गिरड 28, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 29 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात सहभागी रुग्णांसाठी ये-जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीराचे लाभ घ्यावे असे आवाहन रावसाहेब पाटील, गणेश परदेशी, दिपकसिंग राजपूत, दिपक पाटील, किशोर बारवकर यांनी केले आहे.