नवापूर। येथील शिवसेना व यूवा सेनेतर्फे अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्याबाबतचा निषेध निवेदन पत्र तहसीलदार प्रमोद वसावे व पो.नि. विजयसिंह राजपूत यांना देण्यात आले आहे. हिंदूचे श्रध्दास्थान असलेले श्री बाबा अमरनाथ यांच्या यात्रेकरू बसवर अंधाधुंद असा गोळीबार काश्मीरी दहशतवाद्यांनी केला. ह्या भ्याड दहशतवादी हल्याचा शिवसेनेने जाहीर निषेध निवेदन देऊन केला आहे.
निष्पाप यात्रेकरूंवर गोळीबार
सदर यात्रा निर्धोकपणे सुरू असतांना निष्पाप यात्रेकरूंच्या बसवर बेछुट गोळीबार करून अनेकांचे प्राण घेतले. तरी सरकारने अमरनाथ यात्रेकरीता सुरक्षा वाढवावी व यावर कायमस्वरुपी इलाज करावा. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, तालुकाप्रमुख गणेश वडनेरे, शहरप्रमुख आबा मोरे, राहुल टिभे, अनिल वारूळे, प्रवीण ब्रम्हे, आनंद वाघ, दर्पण पाटील, गणेश पाटील, भटु पाटील, दिनेश भोई, किसन कोळी, कालु शर्मा, संकेत पाटील,अजय गावीत, पंकज सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारने केवळ घटनेची निंदा न करता दहशतवाद्यांचा बिमोड केला पाहिजे. शिवसेना तीव्र शब्दात निषेध करीत आहे
गणेश वडनेरे,
तालुकाप्रमुख, शिवसेना नवापूर