भुसावळ : शिवसेना व युवासेनेच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे खुल्या गटात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. यात स्पर्धकांनी कोरोणा रक्षक या विषयावर चित्र काढून या (दीपक धांडे 9371277236, बबलू बर्हाटे 9823321999, हेमंत बर्हाटे 8668857419 , सुरज पाटील 9421682352 या व्हाट्सअप क्रमांकावर 19 जून 2020 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पाठवावे तसेच पानाच्या उजव्या कोपर्यात आपले नाव, गाव व संपर्क क्रमांक लिहून घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांना प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारीरतोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपला सहभाग बहुसंख्येने नोंदवावा, असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेना व युवा सेनेकडून करण्यात आले आहे. परीक्षकांचा निर्णय सहभागी स्पर्धकांना बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे.