शिवसेनेकडून पिंपरीसह चिंचवड आणि भोसरीतील इच्छुकांच्या मुलाखती

0

पिंपरी :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपात युतीची चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी देखील सुरू असून भाजपा पाठोपाठ शिवसेनेने देखील सर्वच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केल्यात. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

शिवसेनेने मंगळवार ( दि. १० रोजी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुंबईतील मातोश्रीवर मुलाखती आयोजित केल्या होत्या. त्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी – चिंचवडभोसरी विधानसभा मतदारसंघातील तब्ब्ल बारा इच्छुकांनी मुलाखतीस हजेरी लावली. शिवसेना नेते अमोल किर्तीकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, शिवसेना प्रवक्ते तथा आमदार मनीषा कायंदे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

शिवसेनेकडून भोसरी विधानसभेतून शिवसेना कामगार नेते तथा भोसरी-खेड विधानसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेवक बाजीराव लांडे, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, रवींद्र खिलारे, शरद हुले अशा सहा जणांनी मुलाखती दिल्या.

पिंपरी विधानसभेतून नगरसेवक सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी मुलाखती दिल्या. तर चिंचवड विधानसभेतून जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी मुलाखती दिल्या आहेत. केवळ इच्छुक उमेदवारांनाच आंमत्रित केल्यामुळे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुलाखतीस हजेरी लावली नाही.