शिवसेनेचे अजय चौधरी गटनेते : शिंदे गटाला मोठा धक्का

विधानसभा उपाध्यक्ष यांनी दिला निर्णय

मुंबई : अजय चौधरी यांची गटनेतेपदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद करण्यात आली आहे तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज अपात्र आमदारांला नोटीस देऊन ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एका दिवशी चार आमदारांची सुनावणी होणार आहे.