भुसावळ। येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील नियोजीत जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लवकरात लवकर अनावरण व्हावे तसेच शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसाला सरकारी नोकरी द्यावी, सातबारा कोरा करावा, शहरातील बँकेत करोडो रुपयांचा मुद्रा लोन घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी व्हावी आदी मागण्यांबाबत शनिवार 3 रोजी शिवस्मारक समिती व शिवसेनेतर्फे प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन प्रांत अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन झाले आहे. मात्र 20 वर्षांपासून अश्वारुढ पुतळ्याच्या उभारणीच्या कार्यात दिरंगाई होत आहे. या संदर्भात अनेक आंदोलने झाली. हिंदू जनजागृती समितीने 2 जून 2016 रोजी शहरात भव्य मोर्चाचे आयोजन केले होते.
उपोषणात यांनी घेतला सहभाग
एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात उमाकांत शर्मा, भुषण महाजन, उमेश जोशी, शशिकांत सुरवाडे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, गणेश काळे, मिलींद कापडे, बबलू धनगर, सुमित झांबरे, शुभम पचेरवाल, केशव पाटील, धिरज पाटील, भरत बोदर, भागवत शेलोडे, राजेंद्र आवटे, प्रशांतसिंह ठावूैर, भुषण कोळी, मिलन साळी, बाळू भोई, राकेश खरारे, गोपाळ तायडे, प्रतिक पाटील, दिनेश दोदानी, शिवाजी दाभट आदींनी सहभाग घेतला.
मुद्रा लोनची चौकशी व्हावी
शहरातील बँकेत करोडो रुपयांचा मुद्रा लोन घोटाळा झाला आहे. या लोकांनी बनावट कागदपत्र जोडून किंवा मयत लोकांचे नावे बँकेतून अधिकार्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. फसवणूक करणार्या टोळींची चौकशी व्हावी आदी मागण्याबाबत प्रांताधिकारी चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अॅड. श्याम श्रीगोंदेकर, नगरसेवक मुकेश गुंजाळ, गणेश काळे, निर्मल दायमा, हर्षल कासुरडे, गणेश पाथरवट, केशव पाटील, राहूल सोनटक्के, प्रविण पाटील, कुणाल मेहेरे, धिरज पाटील, शुभम पचेरवाल, भुषण कोळी, ओम महाले आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
सातबारा कोरा करा
गरीब शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांंच्या वारसाला सरकारी नोकरी द्यावी, सातबारा उतारा कोरा करावा व कृषी पंपासाठी मोफत वीज द्यावी जेणेकरुन शेतकरी शेतकरी अन्न पिकवू शकतील तसेच सिंचनासाठी अनुदान द्यावे व शेतकर्यांना बी – बियाणे मोफत द्यावे, शेतकर्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सवलत मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा त्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.