शिवसेनेच्या आंदोलनानंतर अखेर वाळू माफियांविरुद्ध गुन्हा

0

मुक्ताईनगर तहसील प्रशासनाला उशिरा सूचले शहाणपण

भुसावळ :- पूर्णा नदीपात्रात बोटीद्वारे सर्रास वाळूची चोरी होत असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी करीत आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत थेरोळा-बोदवड दरम्यान कारवाई करीत तीन बोटी 10 जानेवारी रोजी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी सोमवारी अज्ञात आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर तहसील प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय निर्माण होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली अवैध वाहतूक स्थानिक, तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व वरीष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात कशी आली नाही? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.