शेणवा : किन्हवली रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने शेणवा-किन्हवली मार्गावरील खड्डे शुक्रवारपासून खडी व दगडी भुकटी मिश्रणाने भरण्यास सुरुवात केली आहे. या बाबत दै. जनशक्तिने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे प्रवाशांनी शिवसेना व जनशक्तिचे आभार मानले आहेत.