शिवसेनेच्या माजी तालुकाध्यंक्षाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा

0

वरणगाव- घरासमोरील वृक्ष का तोडत आहात? असा जाब विचारल्याने वयोवृद्ध नागरीकाला मारहाण करीत दोन दिवसात घराबाहेर काढतो? अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष संजू लक्ष्मण कोलते यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानदेव छगन हडपे (63, रेणूका नगर) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोरील व मंदिर परीसरात झाडे संशयीत आरोपी संजू कोलते तोडत असताना माझ्या घरासमोरील झाडे का तोडत आहात ? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने कोलते यांनी वयोवृध्द हडपे यांना शिवीगाळ करून दोन दिवसांत घराबाहेर काढतो, अशी धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.