शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

0

धरणगाव । पुरेसा पाऊस न झाल्याने धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. गिरणा धरणात 70ते 80 टक्के पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. या साठ्यातून धरणगाव तालुक्याला तीन वेळा पाटाला पाणी सोडण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी सोमवार 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे रास्ता रास्तारोको आंदोलन करण्यात आले आणि तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, नगराध्यक्ष सलीम पटेल, पं.स.सदस्य सचिन पवार, मुकुंद नंन्नवरे शिवसेनेचे शिष्टमंडळ, युवा सेनेचे भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी उपस्थित होते.