चाळीसगाव । तालुक्यातील कुंझर येथील ग्रामपंचायत कर्मचारी स्व रवींद्र कृष्णा धोबी यांचे तरुण वयात 2 महिन्यांपूर्वी हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात घरात अत्यंत हालाकीची परिस्थिती असल्याने शिवसेना तालुका प्रमुख उन्मेष राजपूत यांच्या कडून 2 महिन्यांचा किराणा राशन तर वाल्मिक महाले यांच्याकडून गहू, तांदूळ स्व. रविंद्र धोबी यांच्या धर्मपत्नी श्रीमती सोनीबाई रविंद्र धोबी यांना देण्यात आले.
नागरीकांची मोठी उपस्थिती
मागील वर्षी स्व. पप्पूदादा गुंजाळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अशीच मदत करण्यात आली होती. शिवसेनेने पुन्हा अशा प्रकारे गरजू कुटुंबाना मदत करण्याच काम तालुक्यात हाती घेतळे आहे त्यामुळे कुंझर ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे महेंद्र पाटील, तालुका प्रमुख उन्मेष राजपुत, शहर प्रमुख नाना कुमावत, नकुल पाटील, शालीवान पाटील, भिकन पाटील, दिनेश पाटील, भिकन कोष्टी, साहेबराव चौधरी, राजेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.