रायगड-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आजपासून रायगडमधून निर्धार परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसूख घेतले. शिवसेनेकडून वारंवार सरकारमधून बाहेर पडण्याची, राजीनामा देण्याची पोकळ घोषणा केली जाते. मात्र राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेना दाखवू शकत नाही. आता शिवसेनेने त्यांच्या पक्ष चिन्हातील वाघाचा फोटो काढून शेळीचा फोटो लावावा, शेळीचा फोटो लावा असे म्हणण्याचे देखील लाज वाटते असे सांगत आता शिवसेनेने ससाचा फोटो लावावा अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांच्या सभेच्या व्यासपीठावर उद्योगमंत्री सुभास देसाई देखील उपस्थित होते. कालच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा देखील होता. एकीकडे भाजपवर आरोप करायचे आणि सत्तेचा आनंद घ्यायचा असे धोरण सेनेचे आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर देखील जोरदार आरोप केले.