मुंबई-मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लातूर दौऱ्यावर असतांना त्यांनी शिवसेनेला उद्देशून ‘पटक देंगे’ असे भाष्य केले होते. दरम्यान यावर शिवसेनेने पलटवार केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही असे खरमरीत पलटवार केले आहे. वरळी येथे त्यांची सभा सुरु आहे त्यावेळी ते बोलत होते.
२०१९ मध्ये कोण जिंकणार कोण निवडणून येणार हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. देश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशापुढील समस्या अजून आहे तशाच आहे असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.