पंढरपूर : इकडे महाराष्ट्रातल्या उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही़ मग, तुम्हाला कशाला पाहिजे बेळगाव़़ असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार शरद बनसोडे यांनी सोलापुरात केले. त्याचबरोबर त्यांनी सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज रविवारी दुपारी ४ च्या सुमारास पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने स्टेशन रोड येथे सोलापूर लोकसभेचे खासदार शरद बनसोडे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी खा.शरद बनसोडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आक्रमक होत पंढरपूर तालुका प्रमुख संभाजी शिंदे, शहर प्रमुख संदीप केंदळे, शहर उपप्रमुख संजय ढाळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा प्रमुख सिध्दनाथ कोरे, बाळासाहेब देवकर, अजय व्यवहारे, युवराज गोमेवाडीकर, समाधान अधटराव, विभाग प्रमुख मंगेश क्षिरसागर, कृष्णा कवडे, भैय्या पिसाळ, आकाश पवार, राजू घंटी, दिलीप खरात यांच्यासह शिवसेना महिला शहर प्रमुख सौ.संगीता पवार, शहर उपाध्यक्षा शबीया शेख, रहीना आतार, शरीफा पठाण, सुनिता चांडोले यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते. खा.बनसोडे मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला व खा.बनसोडे यांचा पुतळा जाळण्यात आला.