जळगाव – शिवाजी नगर परीसरात असलेल्या महाविर जिनींग कंपनीच्या कंम्पाऊन्डमध्ये पार्किंग केलेली मोटारसायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना घडली असून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मीकांत सोमनाथ शेटे (वय-45) रा. ममुराबाद यांनी शिवाजी नगर परीसरात असलेल्या महाविर जिनिंग कम्पाऊंडमध्ये 10 हजार रूपये किंमतीची डीलक्स मोटारसायकल 3 मे ते 5 मे 2018 दरम्यान लावली होती. ती मिळून न आल्याने लक्ष्मीकांत शेटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय भालेराव करीत आहे.