Again two-wheeler Lumpas from Bhusawal city भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागातून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार संजय सूर्यभान शितोळ (48, शिवाजी नगर, भुसावळ) यांची दुचाकी (एम.एच. 19 ए.क्यू.3377) ही कय्यूम पठाण यांच्या दुकानाजवळ लावली असता चोरट्यांनी संधी साधून ती रविवारी भर दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास लांबवली. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.