रावेर । बलात्कार, अहंकार, वाढता भ्रष्टाचार, प्रदुषणाचे काळे संकट रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची वाट बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमच्या आत्म्यालाच हे आलेले संकट रोखू शकतो, असे प्रतिपादन व्याख्यानकार सुमंत टेकाडे यांनी आयोजित कार्यक्रमात केले. येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे छोट्याखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी टेकाडे बोलत होते. पुढे बोलतांना टेकाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मविश्वास, युक्ती आणि युध्द कौशल्याच्या जोरावरच हिंदवी स्वराज्य उभे केले. आताच्या प्रत्येक युवकांमध्ये देशापोटी प्रेम असणे अतिआवश्यक आहे. देशावर आलेले संकट स्वतःवर आल्यासारखे समजून कनिष्ठेने एकत्रित होवून संकटाशी सामना करावा असे त्यांनी आपल्या याख्यानात सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे भक्तिकिशोरदास महाराज, एनडीटीव्हीचे नरेंद्र कदम, पत्रकार भगवान सोनार, रविंद्र पवार, नगरसेवक अॅड. सुरज चौधरी, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, विक्रम बोरकर, अशोक शिंदे, एम.ए. खान, कृष्णा पाटील, देवलाल पाटील, दिलीप वैद्य आदींची उपस्थिती होती.