शिवाजी महाराजांचे चरित्र वंदनीय

0

भुसावळ । शिवचरित्र हे ऐकायला आनंदायी आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा हि केवळ चित्र नसून एक चरित्र आहे. हे चरित्र आचरणात आणून त्याचे पूजन करण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आज 5 रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत देवळालकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश रायपूरे, डॉ.शुभांगी राठी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन भुसावळ शहरात चांंगले वक्ते घडतील असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.

संस्कृती संवर्धन करणे हा उपक्रमाचा उद्देश
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, पराक्रम गाजवून हिंदवी स्वराज्याचे विचार आचरणात आणा. विद्यार्थ्यांनी सक्षम व्हा. या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी मानाचा मुजरा केला. पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी म्हणाले की, निर्भीड विचार पोहचण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाची आहे. पंचायत समिती अशा स्पर्धा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासणे, संस्कृती संवर्धन हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. अंतर्नाद प्रतिष्ठानने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात शनिवार कट्टा, नाट्य चळवळ, कालिदास करंडक यासह अंतर्नाद प्रतिष्ठानने राबविलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासणे ही काळाची गरज असल्याचे प्रकल्प प्रमुख देव सरकटे यांनी सांगितले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
या स्पर्धेत 3 री ते 4 थी पहिल्या गटात समज्ञा श्रीश चिपळोणकर या तु.स. झोपे शाळेच्या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटाविला. द्वितीय क्रमांक हेमंत यशवंत डोळे तर तृतीय क्रमांक मेहक स्वप्नील चौधरी या विद्यार्थीनीने मिळवला. 5 वी ते 7 वी दुस-या गटात प्रथम क्रमांक सोहम ललित बहाळे या के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्याने पटकाविला. द्वितीय क्रमांक दिपाली नरेंद्र सरोसे, शृती उमेश पिंगळे या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक पटाकाविला. 8 वी ते 9 वी तिसर्‍या गटात प्रथम क्रमांक अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी संजय भटकर हिने पटकाविला. द्वितीय भावेश चेतन टोंगळे तर तृतीय क्रमांक अंजली कांतीलाल कानडे हिने मिळविला.

यांनी केले परिक्षण
या वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. शुभांगी राठी, प्रा.कुंदा चौधरी, प्र.ह. दलाल, नरेंद्र महाले, प्रा.डॉ.ए.पी. पाटील, क्रांती वाघ, ऋषीकेश पवार, पौर्णिमा राणे, आनंद सपकाळे, निवृत्ती पाटील, रविंद्र पाटील, उदय जोशी, भाग्यश्री भंगाळे, सीमा भारंबे, सुनिल वानखेडे यांनी काम पाहिले. तसेच शहरातील असंख्य स्पर्धकांमधून उत्कृष्ठ स्पर्धकांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ.जगदीश पाटील, अमित चौधरी, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, अतुल चौधरी, मंगेश भावे, हर्षल पाटील, श्रीकांत जोशी, ऋषीकेश पवार, संजय ताडेकर, निलेश गुरचळ, ज्ञानेश्वर घुले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय भटकर व प्रा.पंकज पाटील यांनी केले. आभार श्याम दुसाने यांनी मानले.