शिवाजी महाराजांचे योगदान आदर्शवत

0

योगेश पाटे : केरबा फाउंडेशनचा कार्यक्रम

नारायणगाव । छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे समाजातील सर्व समाज घटकांसाठी आणि जातीधार्मियांसाठी अद्वितीय असून, समाजोद्धाराचे त्यांचे अतुलनीय योगदान सर्वांसाठी आदर्शवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करून राज्यकारभार झाल्यास सर्वत्र आनंद व समाधान अनुभवायला मिळेल, असे मत नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हलगीसम्राट केरबा पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. माजी उपसरपंच आशिष माळवदकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र
मारुती भुजबळ, रामभाऊ सातपुते, आरीफ आतार, राजेश बाप्ते, भागेश्‍वर डेरे, एजाज चौधरी, तौसीफ कुरेशी, विकासनाना तोडकरी, काशिनाथ आल्हाट आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. गुणवंत आणि हुशार पदवीधर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ आल्हाट तर स्वागत अमित आल्हाट यांनी केले. उपस्थितांचे आभार जुबेर शेख यांनी मानले.