शिवाजी महाराजांच्या यांचा पुतळ्यासाठी आज आत्मदहन

0

चाळीसगाव । शहरातील सिग्नल पॉईंट येथे नियोजीत जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा व 18 फेब्रुवारी रोजी त्या जागेवर पुतळ्याचे भूमिपुजन न झाल्यास अथवा सकारात्मक निर्णय न झाल्यास संभाजी सेनेच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी 21 संभाजी सैनिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा संभाजी सेनेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. चाळीसगाव तालुका व शहरातील समस्त शिवप्रेमी बांधवांची इच्छा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिग्नल पॉईंट वरील नियोजीत जागेवर व्हावा यासाठी मागील शिवजयंतीच्या दिवसापासून संभाजी सेनेच्या वतीने 21 दिवस जनआंदोलन करून त्यात जनतेने सहभाग नोंदवला होता.

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मात्र, त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. नगरपालिकेच्या निवडणूकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांची चाळीसगाव येथे सभा झाली होती. या सभेत त्यांनी आचारसंहीतेचे कारण दाखवून फाईल माझ्या टेबलवर आहे, आचारसंहीता संपल्यावर सही करतो असे सांगून देखील त्यावर आज पावेतो विचार झाला नाही. याबाबत संभाजी सेनेने वारंवार पत्रव्यवहार केला. स्वत:ला कर्तव्यदक्ष म्हणवनारे मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील छत्रपतींच्या नावाने सत्तेत येऊन ते शिवाजी महाराजांना विसरले आहेत. मात्र आम्ही विसरू शकत नाही. त्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी संभाजी सेनेचे 21 सैनिक आत्मदहन करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 पेैब्रुवारी 2017 रोजी शिवजयंती निमीत्त संभाजी सेनेच्या वतीने येथील सिग्नल पॉईंट वर नियोजीत पुतळ्याच्या जागेवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव तालुका व शहरातील समस्त शिवप्रेमी असणार आहेत. या कार्यक्रमास शिवप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी केले आहे.