जळगाव | तालुक्यातील कठोरा बु गावामध्ये गावातील लोकांना विनाकारण शिवीगाळ करु नको असे बोलल्याचा राग मनात ठेवून किशोर उर्फे पिंट्या छगन अहिरे यांने रविंद्र रघुनाथ अहिरे (वय-३०) याच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन त्याला जखमी केले. याप्रकरणी जखमी रविंद्रच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कठोरा बु गावी रघुनाथ कशिराम आहिरे यांचे घर असून त्यांच्या घराच्या बाजुला असलेल्या खोलीत त्यांचा मुलगा रविंद्र राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा चुलतभाऊ किशोर उर्फ पिंटया अहिरे राहतो. दरम्यान किशोर गावातील काही लोकांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. त्यामुळे रविंद्र अहिरे याने त्याला समजवून विनाकारण शिवीगाळ करून नको असे सांगितले. याचा राग मनात ठेवून किशोर उर्फ पिंट्या छगन अहिरे याने रविंद्रच्या घराच्या अंगणात येवून रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याला लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडा रविंद्र डोक्यात मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जखमी रविंद्र याचे वडील रघुनाथ काशिराम अहिरे यांच्या फिर्यादीवरून किशोर उर्फ पिंट्या छगन अहिरे याच्याविरुध्द तालुका पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.