शिष्यवृत्ती पूर्ववत करा

0

पिंपरी । केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीच्या रकमेत कपात केली आहे. या रक्कम कपातीला रयत विद्यार्थी विचार मंचने विरोध दर्शवला आहे. ही कपात रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना धम्मराज साळवे यांनी दिले आहे. केंद्र सरकारने मागील दोन वर्षांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी दिलेल्या 500 कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून, यंदा केंद्राने केवळ 54 कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.