शिसाका संचालकांना पूर्ण मदत करणार

0

शिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या 5 ते 6 वर्शापासून बंद असून शिसाका चेअरमन व संचालक मंडळाने शिसाका सुरू होण्यासाठी शासन दरबारी योग्य तो प्रस्ताव सादर करावा त्यास भाजपा खा.डॉ.हिना गावीत व मी भाजपा जिल्हाध्यक्ष या नात्याने पूर्ण मदत करू, त्यासाठी संचालकांनी ठोस पाऊल उचलावी, असे आवाहन भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले आहे.

संचालकांनी दोन पावले पुढे यावे!
शिसाका चेअरमन व संचालकांनी खासदार व भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चैाधरी यांनी शिसाकासाठी ठोस मदत करावी असे पत्रक प्रसिध्द केले होते त्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चैाधरी यांनी खुलासा केला आहे. या पत्रात पुढे नमुद केले आहे की, 12 मार्च रोजी शिसाका सुरू व्हावा यासाठी विकास फाऊंडेशनने 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी मी भाजपाच्या वतीने पाठींबा देवून संचालकांनी दोन पाऊल पुढे येवून प्रस्ताव सादर करावा असे भाषनातून मी आवाहन केले होते तसेच खा.हिनाताई गावीत यांनी वेळोवेळी केंद्र सरकारमधील संबंधीत मंत्र्यांकडे चर्चा केली आहे.

मी ही राज्याचे सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याशीही वेळोवेळी चर्चा केली आहे. शिवाय केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे, रोहयो तथा पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याशीही चर्चा झालेली आहे. तालुक्यात दोन आमदार आहे त्यांनीही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतू शिसाका संचालकांनी योग्यतो प्रस्ताव तयार करून शासन दरबारी सादर केला नसून तसेच शिसाका बंद असल्याने शेतकरी, कामगार देशोधडीला लागला असून जिल्ह्यातला एकमेव प्रकल्प शेतकरी हिताचा आहे. संचालकांनी बैठक घेवून प्रस्ताव तयार करावा त्यास खासदार व मी केंद्र व राज्य सरकार दरबारी ठोस मदत करणार असल्याचे म्हटले आहे. चेअरमन व संचालकांशी वेळोवेळी चर्चाही झालेली आहे. शिवाय मी शिसाका संचालक नसून मला तसा प्रस्ताव करण्याचा मला अधिकार नाही. शिसाका संचालकांनी दोन पाऊल पुढे येण्याचे आवश्यकता असल्याचे बबनराव चैाधरी यांनी पत्रकात म्हटले आहे.