‘शुभम’ ने आणखी एकाला घातला तीन लाखांचा गंडा

0

जळगाव । शहरातील शिवकॉलनी येथील प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉट नावावर केला. त्याबदल्यात 46 लाखांचा धनादेश मालकाला दिला. तो धनादेश अनादरीत झाल्याने प्लॉट पुन्हा नावावर करून देण्यासाठी दोन्ही भामटयांनी प्लॉट मालकांकडून तीन लाख रुपये घेवून त्याची फसवणुक केल्याप्रकरणी आज रामानंद नगर पोलिसात प्लॉट मालकाच्या फिर्यादीवरून दोन्ही भामटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

46 लाखात झाला सौदा
शिवकॉलनी येथील रहिवाशी असलेले प्रकाश हिरामण देवरे यांचे प्लॉट नं 29, गट नं 59 येथे दोन मजली घर आहे. मुलगा शुभम हा शिक्षणकरिता पुणे येथे असल्याने त्याच्या शिक्षणाकरिता पैशांची गरज असल्याने प्रकाश देवरे यांनी दोन मजली घर विक्रीसाठी काढले होते. यावेळी शुभम सुनिल पाटील रा. लक्ष्मी ठाणा नगर, स्वामी नारायण मंदिर, एस.टी. वर्क शॉप जवळ व जितेंद्र सुनिल पाटील रा. धानवड यांनी हे घर विकत घेण्याचे ठरविले. यावेळी शुभम सुनिल पाटील व जितेेंद्र सुनिल पाटील यांनी या दोन मजली इमारतीचे बनावट खरेदीखत तयार करून इमारतीच्या जागी, बखळ प्लॉट दाखवून 46 लाख रुपयात या जागेची 16 सष्टेंबर 2017 रोजी खरेदी केली होती. शुभम पाटील व जितेंद्र पाटील यांनी प्रकाश देवरे यांना 46 लाख रुपयांचा येस बँकेचा धनादेश दिला. त्यानुसार प्रकाश देवरे यांनी धनादेश स्टेट बँकेच्या खात्यावर जमा केला. दरम्यान बँकेतून देवरे यांना 46 लाखांचा धनादेश अनादरित झाला असल्याचे सांगितले. दरम्यान देवरे बँकेत गेले असता, बँकेच्या अधिकार्यांनी अनादरित धनादेश शुभम पाटील घेवून गेले असल्याचे सांगितले.

3 लाख घेतले
प्लॉटचा व्यवहार पूर्ण न झाल्याने शुभम पाटील, जितेंद्र पाटील यांनी प्लॉट पुन्हा प्रकाश देवरे यांच्या नावावर करून देण्यासाठी त्यांच्याकडून 3 लाख घेतले. यावेळी देवरे यांना प्लॉट हा दोन मजली असतांना शुभम पाटील व जितेंद्र पाटील यांनी खरेदी खतावर बखळ दाखविल्याचे समजले. तसेच आपली फसवणुक झाल्राचे लक्षात रेताच प्रकाश देवरे रांनी पोलिसात तक्रार दिली. त्रानुसार दोघांविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्रात गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वी रामानंद नगर पोलिसात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शुभम सुनिल पाटील याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान पोलिस जितेंद्रचा शोध घेत आहे.